- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-बँक खाते ब्लॉक झाल्याने कर्जदाराने कर्ज परतफेडीसाठी दिलेला चेक बाउन्स झाला.या प्रकरणात नागपूर जिल्ह्याच्या सावनेर येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी स.र.भरड यांच्या न्यायालयाने कर्जदारास दोषी ठरवीत एक महिन्याचा कारावास आणि तीन लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.जावेद करीम पठाण याने सावनेर शहरातील माऊली नवनिर्माण निधी लिमिटेडच्या शाखेकडून दोन लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.कर्ज थकीत राहिल्याने बँकेने त्याला नोटीस बजावल्या.त्यामुळे त्याने कर्जाच्या परतफेडीसाठी बँकेला दोन लाख रुपयांचा चेक दिला.हा चेक न वटल्याने बँकेने त्याला सूचना केली; परंतु त्याने तोडगा काढला नाही. सावनेर येथील प्रथम श्रेणी न्यायालयाचा निवाडा परिणामी,बँकेने सावनेर शहरातील प्रथम श्रेणी न्यायालयात प्रकरण दाखल केले.न्यायदंडाधिकारी स.र.भरड यांच्या न्यायालयाने दोन्ही पक्षांकडील युक्तिवाद एकूण घेत जावेद पठाण यास दोषी ठरविले.या प्रकरणात न्यायालयाने त्याला एक महिन्याचा साधा कारावास आणि तीन लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.न्यायालयात बँकेकडून अॅड. विजय मेटकर यांनी युक्तिवाद केला.
- Advertisement -