उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :- राज्याच्या शेवटच्या टोकावरील मागासलेल्या भंडारा व गोंदिया जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अनेक लाभार्थ्यांना घरे मंजूर करण्यात आली आहेत. जेणेकरून बेघर गरजूंना त्यांच्या स्वप्नातील घरे मिळावीत.मात्र बांधकामासाठी वाळूच्या किमतीमुळे गोरगरिबांच्या खिशापेक्षा घरे महाग असल्याने बांधकामात अडथळे येत आहेत.
या गंभीर प्रश्नावर अनेक शेतकरी मजूर व आर्थिक अडचणीत असलेल्या लाभार्थ्यांनी क्षेत्राचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्या समक्ष आपली स्थिती ठेवत वाळूचा प्रश्न उपस्थित केला होता.या प्रकरणी भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेऊन ही बाब त्यांच्यासमोर ठेवली. तसेच पीएम आवास योजनेचे दोन्ही जिल्ह्यातील लाभार्थ्यांना शासनातर्फे पाच ब्रास वाळू मोफत देण्याची मागणी केली होती.फुके यांच्या प्रकरणाची तातडीने दखल घेत महसूलमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.