Wednesday, November 18, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्हा परिषद अनुकंपा नियुक्तीसाठी समुपदेशन; प्रतीक्षासूचीतील १९२ उमेदवारांना मूळ कागदपत्रांसह उपस्थित...

गडचिरोली जिल्हा परिषद अनुकंपा नियुक्तीसाठी समुपदेशन; प्रतीक्षासूचीतील १९२ उमेदवारांना मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड संवर्गातील रिक्त पदांवर अनुकंपा नियुक्तीसाठी येत्या,सोमवार २ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता समुपदेशन आयोजित करण्यात आले आहे. अंतिम प्रतीक्षासूचीतील संबंधित उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह जिल्हा परिषदेच्या वीर बाबुराव शेडमाके सभागृहात उपस्थित राहावे,असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे.
३१ डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत पूर्ण झालेल्या अनुकंपा प्रकरणांची तपासणी करून संपूर्ण माहिती असलेल्या १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षासूची तयार करण्यात आली आहे.ही सूची जिल्हा परिषदेच्या https://zpgadchiroli.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सूचना फलकांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या प्रतीक्षासूचीतील गट-क च्या अनुक्रमांक १ ते १७६ आणि गट-ड च्या अनुक्रमांक १ ते १६ पर्यंतच्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली आहे.या उमेदवारांचे शैक्षणिक अर्हतेनुसार नियुक्तीसंबंधी समुपदेशन होणार आहे.
अनुकंपा नियुक्तीची प्रक्रिया ज्येष्ठता,शैक्षणिक अर्हता आणि सामाजिक प्रवर्गानुसार उपलब्ध रिक्त पदांवर समुपदेशनाद्वारे पारदर्शकपणे राबविण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला किंवा भूलथापांना बळी पडू नये,असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले आहे.
नियुक्तीसाठी कोणी पैशांची मागणी केल्यास किंवा नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्याशी ९४०५२१७८७६ किंवा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन)अनिकेत पाटील यांच्याशी ९७६७५०१५३० या भ्रमणध्वनी क्रमांकांवर थेट संपर्क साधावा,असे जिल्हा परिषद प्रशासनाने कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोलीतील वैद्यकीय महाविद्यालय,राष्ट्रीय महामार्ग आणि अन्य विकासकामे अनावश्यक वन्यजीव परवानग्यांच्या अटींमुळे प्रलंबित राहू नयेत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – बांबू लागवडीतून इथेनॉल निर्मितीला चालना..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय,राष्ट्रीय महामार्ग आणि अन्य विकासकामे अनावश्यक वन्यजीव परवानग्यांच्या अटींमुळे प्रलंबित राहू नयेत.प्रत्यक्ष व्याघ्र भ्रमणमार्ग नसलेल्या...

सायबर गुन्हेगारांनी चक्क पोलीस आयुक्तांचाच व्हॉट्सॲप केला हॅक..!

उद्रेक न्युज वृत्त :-सायबर गुन्हेगार कधी काय करतील याचा नेम नाही.सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट करणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी चक्क पोलीस आयुक्तांचेच व्हॉट्सॲप हॅक करून त्यांच्या स्टेटसवर...

आजचे मंत्रिमंडळ निर्णय; नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांकडून लुटून नेलेल्या शस्त्रांबाबत माहिती देणाऱ्यांना मिळणार रोख बक्षीस..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य मंत्रिमंडळाची आज,मंगळवार १७ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत महत्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत एकूण चार निर्णय घेण्यात...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व आमदारांचा दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना मदतीचा हात.. -एक महिन्याचे वेतन दिले मुख्यमंत्री सहाय्यता निधीस..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील विधानसभा आणि विधान परिषदेतील सर्व आमदारांनी आपले एक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!