Wednesday, November 18, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित व विशेष निमंत्रित सदस्यांची निवड.. -नामदेव उसेंडीसह...

गडचिरोली जिल्हा नियोजन समितीवर नामनिर्देशित व विशेष निमंत्रित सदस्यांची निवड.. -नामदेव उसेंडीसह कृष्णा गजबेंची वर्णी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्हा नियोजन समितीवर (डीपीसी) नामनिर्देशित व विशेष निमंत्रित सदस्यांची निवड करण्यात आली आहे.याबाबत महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाकडून ३ नोव्हेंबरला शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. “महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती(रचना व कामे)अधिनियम, १९९८ मधील कलम ३(३)दोन (ब)नुसार विधानमंडळ किंवा संसद सदस्यांमधून नियुक्त नामनिर्देशित २ सदस्य तसेच कलम ३(३)चार(फ)नुसार “विशेष निमंत्रित” म्हणून ८ अशा एकूण १० व्यक्तींची गडचिरोली जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समितीवर “नामनिर्देशित सदस्य” व “विशेष निमंत्रित” सदस्य म्हणून नामनिर्देशन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.त्यानुसार,दोन विद्यमान आमदार व उर्वरित माजी आमदार यांचेसह विविध पदाधिकाऱ्यांची समितीवर वर्णी लागली आहे.नामनिर्देशित सदस्यांचा कालावधी शासनाकडून सदर नामनिर्देशन रद्द होईपर्यंत किंवा सध्याच्या मंत्रिमंडळाच्या पदावधीपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल,तोपर्यंत अबाधित राहील,असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.
  •  नामनिर्देशित सदस्य👇
१.धर्मरावबाबा आत्राम,विधानसभा सदस्य –
राजवाडा अहेरी,मु.पो.ता.अहेरी,जि.गडचिरोली
२.मिलिंद नरोटे,विधानसभा सदस्य-कर्तव्य कक्ष,एस-मार्टच्या बाजुला पोटेगांव बायपास,चामोर्शी बस स्टॉप, गडचिरोली
  •  विशेष निमंत्रित सदस्य👇
१.डॉ.संगीता राऊत- प्रदेश सदस्य-भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र,ता.आरमोरी,जि. गडचिरोली
२.डॉ.नामदेव उसेंडी- माजी आमदार,विधानसभा क्षेत्र गडचिरोली,जि.गडचिरोली
३.कृष्णा गजबे- माजी आमदार,विधानसभा क्षेत्र आरमोरी,ता.देसाईगंज,जि.गडचिरोली
४.किशन नागदेवे- माजी जिल्हाध्यक्ष,भाजपा,ता. देसाईगंज,जि.गडचिरोली
५.सदानंद कुथे- जिल्हा महामंत्री,भाजपा,ता.आरमोरी, जि.गडचिरोली
६.वर्षा मोरे- सामाजिक कार्यकर्ता तथा शिवसेना संपर्क प्रमुख गडचिरोली,जि.गडचिरोली
७.राकेश बेलसरे- मु.आष्टी,ता.चामोर्शी,जि.गडचिरोली
८.संदिप ठाकूर- मु.पो.जोगीसाखरा,ता.आरमोरी,जि. गडचिरोली
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बेसुमार महागाई; सर्वजण चिडीचूप..! -पुढाऱ्यांची इच्छाशक्तीही खतम..

उद्रेक न्युज वृत्त :-बेसुमार महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडू लागले आहेत.पण,सर्वजण चिडीचूप राहून एखाद्या नाट्य रसिक जणांप्रमाणे उघड्या डोळ्यांवर झालर पांघरून बसलेत.हल्ली शेतमालाचे भाव पडल्यामुळे...

गडचिरोलीतील वैद्यकीय महाविद्यालय,राष्ट्रीय महामार्ग आणि अन्य विकासकामे अनावश्यक वन्यजीव परवानग्यांच्या अटींमुळे प्रलंबित राहू नयेत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – बांबू लागवडीतून इथेनॉल निर्मितीला चालना..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय,राष्ट्रीय महामार्ग आणि अन्य विकासकामे अनावश्यक वन्यजीव परवानग्यांच्या अटींमुळे प्रलंबित राहू नयेत.प्रत्यक्ष व्याघ्र भ्रमणमार्ग नसलेल्या...

सायबर गुन्हेगारांनी चक्क पोलीस आयुक्तांचाच व्हॉट्सॲप केला हॅक..!

उद्रेक न्युज वृत्त :-सायबर गुन्हेगार कधी काय करतील याचा नेम नाही.सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट करणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी चक्क पोलीस आयुक्तांचेच व्हॉट्सॲप हॅक करून त्यांच्या स्टेटसवर...

आजचे मंत्रिमंडळ निर्णय; नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांकडून लुटून नेलेल्या शस्त्रांबाबत माहिती देणाऱ्यांना मिळणार रोख बक्षीस..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य मंत्रिमंडळाची आज,मंगळवार १७ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत महत्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत एकूण चार निर्णय घेण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!