Tuesday, March 25, 2025
Homeनाशिकखाकी वर्दीतील भावनिक ओलावा.. परीक्षा देत असतांनाच अचानक विवाहितेला सुरू झाल्या प्रसूती...
spot_img

खाकी वर्दीतील भावनिक ओलावा.. परीक्षा देत असतांनाच अचानक विवाहितेला सुरू झाल्या प्रसूती कळा.. – पोलिसांनी तातडीने रुग्णालयात केले दाखल; विवाहितेने गोंडस मुलीला दिला जन्म..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नाशिक :-विद्यालयीन तसेच महाविद्यालयीन जीवनात अनेकजण जीवाचे रान करून पुढील भविष्याची तजवीज करतांना दिसून येतात.यात काहींना यश येते तर काहींना अपयश पत्करावा लागतो.नियतीपुढे दगडालाही पाझर फुटतो असाच प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला.खाकी वर्दीतही भावनिक ओलावा असतो,याची प्रचिती देणारी घटना काल,रविवारी १ डिसेंबरला घडली.एक गर्भवती महिला व तिच्या गोंडस बाळाचे प्राण पोलिसांची संवेदनशीलता व सतर्कतेमुळे वाचले. ही बाब तिच्या पती आणि नातलगांना समजताच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले.एमपीएससीची परीक्षा देत असलेल्या विवाहितेला अचानक प्रसूती कळा सुरू झाल्या होत्या.तिला पोलिसांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले.तिथे गोंडस मुलीला जन्म दिला आहे.
स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी महिला पतीसह मालेगावहून नाशिकमध्ये आली होती.परीक्षेचे केंद्र असलेल्या के. व्ही.एन.नाईक महाविद्यालयात पेपर सुरू होताच तिला प्रसूती कळा सुरू झाल्या.रक्तस्राव झाल्याने अस्वस्थ झालेल्या महिलेस इस्पितळात दाखल करण्यासाठी महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्याशी संपर्क साधला.पोलिस हवालदार जयंत जाधव,पोलिस अंमलदार रोशनी भामरे त्यावेळी कर्तव्यावर होते.महिलेस मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाल्याचे महाविद्यालयातील पर्यवेक्षकांनी पोलिसांना सांगितले.घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ केंद्राकडे धाव घेत परीक्षा केंद्राबाहेर उभ्या असलेल्या शासकीय वाहनातून महिलेस उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले.
डॉक्टरांनी या महिलेस तपासून मुदतपूर्व प्रसूतीची केस असल्याचे सांगत शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करण्याची तयारी सुरू केली.ही बाब डॉक्टरांनी पोलिसांनी सांगितली.पोलिस अंमलदार जयंत जाधव यांनी या महिलेचा पती आणि चुलत भावाचा संपर्क क्रमांक मिळवला.त्यांनी रमाबाई आंबेडकर कन्या शाळेत कर्तव्य बजावत असलेल्या मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या पोलिसांशी संपर्क साधत एमपीएससीची परीक्षा दुसऱ्या केंद्रावर देत असलेल्या त्यांच्या पतीला याबाबत निरोप दिला.त्यानुसार मुंबई नाका पोलिसांनीही पर्यवेक्षकांना माहिती दिली.पतीने तात्काळ रुग्णालयात धाव घेतली.महिलेने एका गोंडस मुलीली जन्म दिला असून दोघींचीही प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.पोलिसांची गोल्डन अवर्समध्ये मदत मिळाली.अन्यथा बाळ आणि बाळंतिणीच्या जीवाला धोका होता.के.व्ही.एन.नाईक महाविद्यालयात कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि सतर्कता यातून मायलेकी सुरक्षित आहेत.
Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सुरक्षा दलांशी चकमक; तीन नक्षलींचा खात्मा..

उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलांची तीव्र कारवाई सुरू आहे.नुकतेच गुरुवार २० मार्च रोजी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत...

कारागृहातील बंदींसाठी ‘जीवन गाणे गातच जावे’ सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न…

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- ‘जीवन गाणे गातच जावे’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन,सांस्कृतिक कार्य विभाग व कारागृह संचालनालय यांच्या वतीने आज,मंगळवार २५ मार्च रोजी गडचिरोली जिल्हा...

अवैध रेतीची वाहतूक अंगलट; रेती भरलेला टिप्पर उलटून चालक ठार..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करतांना भरधाव वेगात असलेला टिप्पर उलटून चालक जागीच ठार झाला तर सहकारी गंभीर जखमी झाल्याची घटना गोंदिया...

पैसे घेण्याचा नवा फंडा; कामे मंजूर करून पैश्यासाठी बायकोच्या खात्याचा वापर.. – गडचिरोली जिल्हा नियोजन अधिकाऱ्याचा प्रताप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शासकीय अधिकारी,कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार भरमसाठ पगार (वेतन)असूनही अनेकांचे वरच्या कमाई शिवाय पोटच भरत नाही; असे वाटते.याला काहीजण अपवादही आहेत.त्यातच सुरुवातीला...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!