उद्रेक न्युज वृत्त
कुरुड :- नुकतेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२३ इयत्ता १०वी चा निकाल घोषित करण्यात आला. यात देसाईगंज पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या राधेश्याम बाबा विद्यालय कुरुड येथिल विद्यार्थी प्रियांशू प्रमोद निकोसे याने ४२५ गुण (८४.८०%) घेऊन कुरुड केंद्रातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.प्रियांशू ने पाच विषयात प्राविण्य श्रेणीत गुण प्राप्त केले आहे.त्याने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व शिक्षकवृंदाना दिले आहे.राधेश्याम बाबा ग्रामीण ज्ञान प्रसारक मंडळचे अध्यक्ष प्रा.विजय कावळे,मुख्याध्यापक जी.बी.कावळे व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.