- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-सुसाट वेगाने जात असलेली कार अनियंत्रित झाली आणि रोडवरील खांबावर जोरात आदळली.यात कारमधील एका तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर दोघेजण गंभीर जखमी झाले.सदरची घटना कामठी शहरालगत कामठी-नागपूर महामार्गावरील स्मशानभूमीजवळ काल,मंगळवारी २६ नोव्हेंबरला सकाळच्या सुमारास घडली.रोशन नीलाबार नायक वय २६ वर्षे,रा.रामगड, कामठी,असे मृताचे नाव असून,गंभीर जखमींमध्ये कारचालक सय्यद अमीर सहजाद सय्यद साबीर वय २६ वर्षे,रा.फुटाणा ओळ,कामठी व रोशनचा मित्र अभिषेक शिवनारायण परमार वय २३ वर्षे,रा.प्रीती लेआउट,न्यू येरखेडा,ता.कामठी या दोघांचा समावेश आहे.तिघेही नागपूर विमानतळावर नोकरी करतात. त्यांना कामावर जायचे असल्याने ते काल मंगळवारी सकाळी एमएच-४०/सीक्यू-३८०४ क्रमांकाच्या कारने नेहमीप्रमाणे कामठीहून नागपूरला जात होते.ते शहरालगतच्या स्मशानभूमीजवळ पोहोचताच चालक सय्यदचा वेगात असलेल्या कारवरील ताबा सुटला आणि वेळीच अनियंत्रित झालेली कार रोडलगतच्या लोखंडी खांबावर जोरात आदळली.माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक सुरेश पठाडे,विकास तिडके सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.घटनास्थळी दाखल होत पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनेचा पंचनामा केला आणि जखमींना उपचारासाठी जवळच्या खासगी हॉस्पिटलमध्ये भरती केले.तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती रोशनला मृत घोषित केले,तर अन्य दोघांवर उपचार सुरू केले.याप्रकरणी कामठी (नवीन) पोलिसांनी कार चालक सय्यद याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २८१,१०६,१२५ (अ),१२५ (ब) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुरेश पठाडे करीत आहेत.
ज्या लोखंडी खांबावर ही कार आदळली,त्या खांबावर लोखंडी रॉड आहेत.धडक लागताच रॉड कारमध्ये समोरच्या भागातून पाच फुटांपर्यंत आत शिरले होते. यावरून कारचा वेग आणि धडकेची तीव्रता लक्षात येते.याच रॉडमुळे कारमध्ये डाव्या बाजूला बसलेला रोशन गंभीर जखमी झाला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.सय्यद व अभिषेक या रॉडपासून बचावले असले तरी त्यांना कारचा भाग लागल्याने गंभीर जखमी झाले.
- Advertisement -