- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यात एक खळबळजनक घटना नुकतीच उघडकीस आली आहे.पुरबाधित शेतकऱ्यांचे बनावट पंचनामे तयार करून शासनाची रक्कम तलाठी,कोतवाल आणि पोलीस पाटलाने हडप केली.सदरचे प्रकरण गावातीलच काही शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून समोर आले आहे.सरकार आणि शेतकऱ्यांमधला दुवा म्हणून काम करणाऱ्या प्रशासनातीलच महत्त्वाच्या पदावरील अधिकाऱ्यांनी सदरचा प्रकार केल्याने कुंपणानेच शेत खाल्ल्याचे सदर प्रकारावरून दिसून येत आहे.
माहितीनुसार,सप्टेंबर २०२४ मध्ये आलेल्या भंडारा जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा लाभ उचलण्यासाठी सहा शेतकऱ्यांनी तलाठी,कोतवाल आणि पोलीस पाटील यांच्या मदतीने बनावट पंचनामे तयार करून राज्य सरकारकडून मिळणाऱ्या पूरग्रस्तांचा आर्थिक मोबदला उचलला.सदरचा धक्कादायक प्रकार भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यातील सुकळी नकुल या गावात उघडकीस आला आहे.ही धक्कादायक बाब गावातीलच काही शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीवरून समोर आली.पूरग्रस्ताची ही मदत उचलण्यासाठी सहा शेतकऱ्यांनी पंचनामे करणाऱ्या पथकाला त्यांची शेती त्यांच्या पत्नीच्या नावाने असल्याची पंचनाम्यात नोंद केली आणि ती रक्कम डीबीटीच्या(थेट लाभ हस्तांतरण)माध्यमातून बँक खात्यात वळती करून उचल केली.ग्रामस्थांच्या तक्रारीवरून तुमसरचे तहसीलदार मोहन टिकले यांनी फेर चौकशी केली असता,त्यात ही बाब खरी असल्याचे उघडकीस आले.याचा संपूर्ण चौकशी अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर करणार असल्याची माहिती तुमसरचे तहसीलदार यांनी दिली.सदर प्रकरणी तलाठी,कोतवाल आणि पोलीस पाटील यांच्यावर आता काय कारवाई केली जाणार,याकडे सर्वांच्या नजरा भिडल्या आहेत.
- Advertisement -