- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-अधिवेशनात औरंगजेबाबद्दलचे वक्तव्य केल्या प्रकरणी नुकतेच समाजवादी पक्षाचे नेते तथा आमदार अबू आझमी यांना ५ मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.सदरचे प्रकरण ताजे असतांनाच आता राज्यात औरंगजेबाची कबर हटाव मोहिम राबविण्यात येत आहे.त्यासाठी विविध संघटनांकडून राज्यात आंदोलने,मोर्चे बांधणी करण्यात येत आहे.अशातच आज,सोमवारी १७ मार्चला नागपुरात औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करीत दुपारच्या सुमारास विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली.त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला.त्यातच संध्याकाळी सातच्या सुमारास दुसरा गट रस्त्यावर उतरला.त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली.काही ठिकाणी वाहने पेटवून देण्यात आली.शिवाजी चौकात दोन गट आमनेसामने आले.त्यांना पोलिसांनी चिटणीस पार्कापर्यंत मागे ढकलले.परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.मात्र,त्यानंतरही तणाव कायम आहे.दोन्ही गटातील शेकडो लोक रस्त्यावर असून पोलिसांवर तुफान दगडफेक केली जात आहे.त्यात काही पोलीस जखमीदेखील झाले आहेत.भालदारपुराकडून अग्रसेन चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी वाहने पेटवून देण्यात आलेली आहेत.
- Advertisement -