- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-आर्थिक वर्ष संपण्यास अवघे काही दिवस उरलेले असतांनाही देसाईगंज शहरात मोठ्या प्रमाणावर अनेकांकडे थकीत कर असल्याने नगरपरिषदेद्वारे साहित्य जप्तीची धडक कारवाई तसेच मालमत्तांना टाळे ठोकण्यात येत आहेत.अशातच नगरपरिषदेद्वारे शहरातील थकीत करदात्यांवर सुरु असलेल्या कारवाई दरम्यान जुनी वडसा स्थित मार्गावरील ‘ए ए एनर्जी कंपनीने’ नगरपरिषदेचे १३ लाख रुपये थकविल्याने सोमवार १७ मार्च रोजी कंपनी(कारखाना) सीलबंद करण्यात आली.
मागणी देयक तथा वारंवार नोटीस बजावूनसुद्धा सदर कंपनीने नगरपालिकेचा कर भरणा करण्यास टाळाटाळ केल्याने नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ.कुलभूषण रामटेके यांचे आदेशान्वये कर निरीक्षक स्वप्नील हमाने यांच्या नेतृत्वात कर व प्रशासकीय अधिकारी प्रफुल हटवार,कर लिपिक दिनकर खेत्रे,शैलेश खांडेकर,विमल सोनवाने,मनोज हटवार,रोशन रंगारी व कर्मचाऱ्यांनी कंपनीला सील ठोकले.यामुळे ए ए एनर्जी कंपनीचे कर्मचारी दुसऱ्याच दिवशी नगरपरिषद कार्यालयात जाऊन थकीत कराचा भरणा करून गेले.यामुळे कंपनीचे सील दुसऱ्याच दिवशी उघडण्यात आले.कंपनीला टाळे ठोकण्यात आल्याने कंपनीच्या अधिकारी,कर्मचाऱ्यांना एक दिवसाकरिता कंपनीच्या बाहेर बसण्याची वेळ आली होती.नगरपरिषदेद्वारे शहरात जप्ती पथक कार्यरत असून थकीत करदाते यांचेवर कडक कारवाई करण्यात येत आहे.यामुळे शहरातील थकीत करदाते स्वत:हून नगरपरिषदमध्ये जाऊन कर भरणा करीत आहेत.परंतु काही करदाते कर भरणा करण्यास टाळाटाळ करीत असल्याने जप्तीच्या कारवाईस सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी वेळेत कराचा भरणा करावा,असे आवाहन देसाईगंज नगरपरिषदेद्वारे करण्यात आले आहे.
- Advertisement -