- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-भारतीय उद्योजकता विकास संस्था (ईडीआयआय),अहमदाबाद यांच्यामार्फत २४ ते २६ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत अहमदाबाद येथे १७ वी द्वैवार्षिक उद्योजकता परिषद आयोजित करण्यात येणार आहे.या परिषदेसाठी पात्र इच्छुकांनी संशोधनपर लेख सादर करावेत,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी लक्ष्मीशंकर यादव यांनी केले आहे.परिषदेत संशोधक, प्राध्यापक,शिक्षणतज्ज्ञ आणि संबंधित क्षेत्रातील व्यावसायिकांना उद्योजकता विकासासंबंधी संशोधन,अनुभव व निष्कर्ष सादर करण्याची संधी मिळणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील विद्यापीठांचे कुलसचिव, विभागप्रमुख,संशोधन विभाग,संबंधित संस्थांमधील प्राध्यापक,संशोधक,विद्यार्थी,क्रीडा संघटना व इच्छुकांनी परिषदेसंदर्भातील सविस्तर माहिती https://conference.ediindia.org या संकेतस्थळावर पाहावी.संशोधनपर लेख conference@ediindia.org या ई-मेल पत्त्यावर सादर करावेत,असे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
- Advertisement -

