Wednesday, November 18, 2026
Homeगडचिरोलीउद्याला 'विकसित भारत युवा संसद २०२६'; जिल्हास्तरीय स्पर्धा.. -लोकसभा आणि विधानसभा निवडणुका...

उद्याला ‘विकसित भारत युवा संसद २०२६’; जिल्हास्तरीय स्पर्धा.. -लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या संकल्पनेवर विचार मांडण्याची संधी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय,भारत सरकार यांच्या मेरा युवा भारत(MY Bharat) उपक्रमांतर्गत विकसित भारत युवा संसद २०२६ या जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन गडचिरोली जिल्ह्यात करण्यात येत आहे.या स्पर्धेसाठी “एक राष्ट्र, एक निवडणूक(One Nation, One Election)” हा विषय निश्चित करण्यात आला आहे.
ही स्पर्धा उद्या,रविवार १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजता गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली येथे आयोजित करण्यात येणार आहे.स्पर्धेतील प्रत्येक सहभागीला भाषण सादर करण्यासाठी ३ मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे.
“एक राष्ट्र,एक निवडणूक” या विषयाच्या माध्यमातून देशातील लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याच्या संकल्पनेवर युवकांना आपले विचार मांडण्याची संधी मिळणार आहे.या विषयाच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया,लोकशाही व्यवस्था,घटनात्मक तरतुदी,संभाव्य फायदे आणि आव्हाने यावर युवकांना आपली मते मांडता येतील.
विकसित भारत युवा संसद उपक्रमाचा उद्देश युवकांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करणे,संसदीय कार्यपद्धतीची माहिती देणे,नेतृत्वगुण व वक्तृत्वकौशल्य विकसित करणे आणि राष्ट्राच्या विकासप्रक्रियेत युवकांचा सक्रिय सहभाग वाढविणे हा आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील पात्र युवक-युवतींनी ऑनलाइन नोंदणी करून या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन मेरा युवा भारत, गडचिरोलीचे जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बेसुमार महागाई; सर्वजण चिडीचूप..! -पुढाऱ्यांची इच्छाशक्तीही खतम..

उद्रेक न्युज वृत्त :-बेसुमार महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडू लागले आहेत.पण,सर्वजण चिडीचूप राहून एखाद्या नाट्य रसिक जणांप्रमाणे उघड्या डोळ्यांवर झालर पांघरून बसलेत.हल्ली शेतमालाचे भाव पडल्यामुळे...

गडचिरोलीतील वैद्यकीय महाविद्यालय,राष्ट्रीय महामार्ग आणि अन्य विकासकामे अनावश्यक वन्यजीव परवानग्यांच्या अटींमुळे प्रलंबित राहू नयेत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – बांबू लागवडीतून इथेनॉल निर्मितीला चालना..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय,राष्ट्रीय महामार्ग आणि अन्य विकासकामे अनावश्यक वन्यजीव परवानग्यांच्या अटींमुळे प्रलंबित राहू नयेत.प्रत्यक्ष व्याघ्र भ्रमणमार्ग नसलेल्या...

सायबर गुन्हेगारांनी चक्क पोलीस आयुक्तांचाच व्हॉट्सॲप केला हॅक..!

उद्रेक न्युज वृत्त :-सायबर गुन्हेगार कधी काय करतील याचा नेम नाही.सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट करणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी चक्क पोलीस आयुक्तांचेच व्हॉट्सॲप हॅक करून त्यांच्या स्टेटसवर...

आजचे मंत्रिमंडळ निर्णय; नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांकडून लुटून नेलेल्या शस्त्रांबाबत माहिती देणाऱ्यांना मिळणार रोख बक्षीस..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य मंत्रिमंडळाची आज,मंगळवार १७ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत महत्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत एकूण चार निर्णय घेण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!