Monday, December 15, 2025
Homeउद्रेक न्युज वृत्तआता दहावी परीक्षेच्या निकालाची उत्सुकता.. - अकरावीची प्रवेश प्रक्रिया १९ मे पासून..

आता दहावी परीक्षेच्या निकालाची उत्सुकता.. – अकरावीची प्रवेश प्रक्रिया १९ मे पासून..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-नुकताच ५ मे रोजी बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.यंदाही बारावीत मुलींनी बाजी मारत ‘हम किसिसे कम नहीं’ करून दाखवले आहे.अशातच आता दहावी बोर्डाच्या परीक्षेच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.अद्याप शिक्षण मंडळाने दहावी परीक्षेच्या निकालाच्या तारखेची अधिकृत घोषणा केलेली नसून दहावीचा निकाल १५ मे पर्यंत येऊ शकतो.बारावीच्या निकालानंतर दहा दिवसांनी दहावीचा निकाल जाहीर केला जाईल,असे सांगण्यात आले होते.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निकालाबाबत उत्सुकता आहे.अकरावीची प्रवेश प्रक्रिया येत्या १९ मे पासून सुरू होणार आहे.शालेय शिक्षण विभागाने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी अकरावीच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले आहे.सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीय ऑनलाइन प्रणालीद्वारे प्रवेश प्रक्रिया सुरू होईल.पोर्टलवर शाळांसाठी आवश्यक असलेली माहिती भरण्याची प्रक्रिया कालपासून म्हणजेच गुरुवार ८ मेपासून सुरू झाली आहे.तर विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज आणि प्रोफाइल तयार करण्याची सुविधा येत्या १९ मे पासून सुरू होईल.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेतीच्या एका ट्रकमुळे उचलबांगडी..! ब्रम्हपुरी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांची होणार विभागीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखाद्याची उचलबांगडी करायची झाली तर अनेकजण त्या व्यक्तीच्या मागे हात धुऊन लागत असतात.नाहीतर कितीतरी तक्रारी वा प्रकरणे आजही कार्यालयात धूळ खात...

आमदार विरोधात बातमी भोवली; हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल.. चार पत्रकारांना पाच दिवसाचा कारावास..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी बातमी वा वृत्त प्रसारित करतांना त्यातील तथ्य तसेच सत्यता तपासणे हे प्रत्येक पत्रकारांचे काम आहे.मात्र,काहीजण याचे उल्लंघन करून एखाद्याची नाहक...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी.. अर्ज भरतांना किंवा ई-केवायसी करतांना झालेल्या चुका सुधारण्यासाठी संधी..

उद्रेक न्युज वृत्त :-'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना' ही राज्य सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेचा लाभ घेणाऱ्या बहुतांश लाभार्थी महिला या...

किती हे हल्ले म्हणावे..! वाघाने घेतला महिलेचा जीव..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस वाढू लागला आहे.विदर्भातील एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ३९ वा तर वाघाच्या हल्ल्यातील ३७ वा बळी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!