- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही “क्रीडा सप्ताह २०२५-२६” भव्यदिव्य पद्धतीने साजरा करण्यात येत आहे.क्रीडा संस्कृतीची जोपासना,खेळाडू व विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाभाव,स्पर्धात्मकता आणि आरोग्यवर्धनाचा संदेश पोहोचविणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.या अनुषंगाने आज,शुक्रवार १२ डिसेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल,क्रीडा व सांस्कृतिक भवन, कॉम्प्लेक्स,गडचिरोली येथे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या प्रोत्साहनासाठी दरवर्षी हा सप्ताह राज्यातील सर्व जिल्ह्यांत साजरा केला जातो.
विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन👇
क्रीडा सप्ताहाच्या कालावधीत १२ ते १८ डिसेंबर २०२५ या दरम्यान जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे खालील क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे-
बॉक्सिंग,बास्केटबॉल,व्हॉलीबॉल,कुस्ती,कबड्डी,खो-खो, बॅडमिंटन आणि टेबल टेनिस.
याशिवाय खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी फिटनेस चाचण्या,आहार मार्गदर्शन,आरोग्य तपासणी आदी प्रोत्साहनात्मक उपक्रमही राबविले जातील. गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तालुका संयोजक व स्थानिक क्रीडा मंडळांमार्फत विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.
राष्ट्रीय खेळाडूंचा गौरव-१८ डिसेंबरला समारोप सोहळा👇
क्रीडा सप्ताहाचा समारोप १८ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता होईल.यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.तसेच आठवडाभरात आयोजित विविध क्रीडा स्पर्धांतील विजेते व उपविजेत्या स्पर्धकांना पदके व गौरवचिन्ह देऊन सन्मानित केले जाईल.गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये,क्रीडा मंडळे व विविध संस्थांनी आपल्या स्तरावर क्रीडा सप्ताहाचे उपक्रम आयोजित करावेत,असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी केले आहे.
- Advertisement -

