- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील हरदोली (झंझाळ) येथील माजी सरपंच अंजिरा झंझाड, उपसरपंच बळवंत झंझाड व ग्रामसेवक ए.एन.माटे यांनी ग्रामपंचायतीमधील रकमेची अफरातफर
केल्याचे लेखापरीक्षणामध्ये सिद्ध झाले.त्यामुळे त्यांच्याकडून अफरातफरीची रक्कम वसूल करण्यात यावी; असे पत्र जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकारी व तत्कालीन सरपंच,उपसरपंच व ग्रामसेवक यांना दिले आहे.
ग्रामसेवक माटे व उपसरपंच बळवंत झंझाड यांचे निधन झाल्याने त्यांच्या हिश्श्याची रक्कम माजी सरपंच अंजीरा झंझाड यांच्याकडून वसूल करण्यात यावी व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा; अशी मागणी माजी सरपंच सदाशिव ढेंगे यांनी केली आहे. हरदोली ग्रामपंचायतीमध्ये तत्कालीन ग्रामसेवक ए. एन.माटे असतांना अंजिरा झंझाड सरपंच होत्या तर बळवंत झंझाड उपसरपंच होते.सन २०००-०१ ते २००६-०७ मधील लेखांचे लेखापरीक्षकामार्फत लेखापरीक्षण करण्यात आले.त्यावेळी ग्रामपंचायतीच्या रकमेची अफरातफर झाली असल्याचे निष्पन्न झाले.निनावी नोंदविलेल्या खर्चात १ लाख ९५ हजार ३१ रुपये अफरातफर झाल्याचे लेखापरीक्षणात निष्पन्न झाले आहे.
सदर अफरातफर १ लाख ९५ हजार ३१ रुपयांपैकी मोहाडीचे गटविकास अधिकारी यांच्या चौकशी अहवालानुसार ग्रामसेवक ए.एन.माटे १ लाख २० हजार ९१ रुपये,उपसरपंच बळवंत झंझाड ३३ हजार १८५ रुपये,सरपंच अंजिरा झंझाड २३ हजार ४७० रुपये याप्रमाणे तिघांहीकडून अफरातफरीची रक्कम वसूल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.या विषयाला धरून तत्कालीन सरपंचांना सुनावणीसाठी जिल्हा परिषदेला बोलाविण्यात आले होते.या अफरातफरीच्या प्रकरणातील ग्रामसेवक माटे व उपसरपंच बळवंत झंझाड यांचे निधन झाले.त्यांच्या हिश्श्याला आलेली अफरातफरीची रक्कम तत्कालीन सरपंच अंजिरा सुखदेव झंझाड यांच्याकडून वसूल करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा; अशी मागणी माजी सरपंच सदाशिव ढेंगे यांनी केली आहे. या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून सर्वांचे कारवाईकडे लक्ष लागले आहे.
अशी होणार वसुली👇
ग्रामसेवक ए.एन.माटे- १ लाख २० हजार ९१ रुपये
सरपंच अंजिरा झंझाड- २३ हजार ४७० रुपये
उपसरपंच बळवंत झंझाड- ३३ हजार १८५ रुपये
- Advertisement -