- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने १३२ जागा,शिंदेंच्या शिवसेनेने ५७ जागा तर अजित पवारांच्या पक्षाने ४१ जागांवर विजय मिळवित महाराष्ट्र राज्यात महायुतीची सत्ता स्थापन होणार आहे.अशातच नागपुरातील एका अपक्ष उमेदवाराला घरच्या कुटुंबातीलही मत मिळाले नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.याबाबत अपक्ष उमेदवाराने पत्रपरिषद घेत याबाबत माहिती दिली आहे.
उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातील २९२ क्रमांकाच्या बूथवर माझ्या कुटुंबातील १८ मते असतांना मला केवळ दोनच मते मिळाली आहेत. त्यामुळे ईव्हीएमद्वारे झालेली मतमोजणी पुन्हा करून न्याय द्यावा; अशी मागणी उत्तर नागपूर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार रमेश बाबुराव फुले यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
रमेश फुले म्हणाले की,सत्तेवर येण्यासाठी भाजपने लाडकी बहीण योजना राबवून मतदारांना प्रलोभन दिले.ईव्हीएमद्वारे मतांचे ध्रुवीकरण केल्यामुळे अपक्ष उमेदवारांना शून्य ते एक मते मिळाली.त्यामुळे ईव्हीएमच्या बोगस मतमोजणीला आमचा विरोध आहे.मला २९२ क्रमांकाच्या बूथवर कुटुंबाची १८ मते असतांना केवळ २ मते मिळाली.त्यामुळे ही मतमोजणीच संशयास्पद आहे.त्यामुळे उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात पुन्हा मतमोजणी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीतून करण्यात आली आहे.मागणीची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.फुले यांना उत्तर नागपूर मतदारसंघात एकूण ११६ मते मिळाली आहेत.
- Advertisement -