- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्टनेसपणा वाढलेला दिसून येतो.जो-तो स्वतःला हून्नरबाज समजू लागला आहे.या जगात नकली लोकांची कमी नाही.असाच प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे.विविध गाण्यांच्या कार्यक्रमात स्वतःला इंडियन आर्मीतील मेजर असल्याचे भासवून जनतेची दिशाभूल करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.आर्मी इंटेलिजन्सने दिलेल्या ‘इनपूट’च्या आधारावर वाडी पोलिस ठाण्यातील पथकाने ही कारवाई केली.
गुलाब उर्फ गोपाल रमेश कनसारे श्री पुर्णल ले-आऊट, दाभा असे आरोपीचे नाव आहे.गोपाल सोशल माध्यमांवरील तसेच गाण्यांच्या विविध कार्यक्रमांमध्ये भारतीय सैन्याचा गणवेश घालून व्हिडीओ काढायचा. तो स्वतःला मेजर असल्याचे सांगायचा व त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जनतेची दिशाभूल करीत होता.त्याने फेसबुक,इन्स्टाग्राम,यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात गाणी अपलोड केली होती.हा प्रकार आर्मीच्या इंटेलिजन्स युनिटच्या लक्षात आला.त्यांनी वाडी पोलिस ठाण्याला कळविले.आर्मी इंटेलिजन्स व वाडी पोलिस ठाण्याच्या पथकाने त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली.
तो दाभा येथील साई हॉटेलमध्ये लपून बसल्याची माहिती मिळाली.पोलिसांनी तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले.त्याने लोकांची दिशाभूल व फसवणूक केल्याचे मान्य केले.त्याला वाडी पोलिस ठाण्यात नेण्यात आले.त्याच्या या कृत्यामुळे तो आर्मी अधिकाऱ्यांची प्रतिमा मलिन करीत होता व त्यामुळे विविध प्रतिक्रियादेखील उमटत होत्या.पोलिस उपनिरीक्षक सतीश गुलबे यांच्या तक्रारीवरून आरोपी गोपाल कनसारे विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम २०५,३१८ (४),३१९ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- Advertisement -