- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशान्वये राज्यभरात खाद्य पदार्थ तसेच अन्य जीवनावश्यक वस्तूंमध्ये भेसळी करून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात तपासणी मोहिमा राबविण्यात येत आहेत.या पार्श्वभूमीवर तपासणी मोहिमेदरम्यान अन्न व औषध प्रशासन विभागाने गेल्या दोन दिवसांत राज्यभरात खाद्यतेल आणि मसाल्यांच्या साठ्यांवर मोठी कारवाई करत सुमारे २८ हजार क्विंटल खाद्यतेल आणि २० हजार क्विंटल मसाल्यांचा साठा जप्त केला.विशेष म्हणजे,करण्यात आलेली कारवाई ही राज्यातील सर्वांत मोठी कारवाई असल्याचे तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे.दरम्यान,अन्न व औषध प्रशासन विभागाने बुलडाणा जिल्ह्यातील पिंपळनेर शिवारात टाकलेल्या धाडीत तब्बल एक कोटी रुपयांचा मसाला जप्त करण्यात आला आहे.तर
कारवाईच्या भीतीने उत्पादकांनी सुमारे दोन कोटी रुपयांचा मसाला माळरानात फेकल्याची माहिती समोर आली आहे.भेसळयुक्त किंवा निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ आढळल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार करावी,असे आवाहन आयुक्त मुंढे यांनी केले आहे.यासाठी विभागाच्या ऑनलाईन तक्रार पोर्टलवर तक्रार नोंदवता येते. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला आहे
- Advertisement -

