- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :- ‘पैश्याची हाव अन् सगळीकडे धाव’ अशी अवस्था सगळ्यांचीच झाली आहे.त्यातच सासूचा सूनेवरील अविश्वास आणि संपत्तीतून बेदखल करण्याचा प्रयत्न नुकताच गोंदिया शहरात उघडकीस आला आहे.जिवंत सुनेचा मृत्यू झाल्याचे भासवून खोटे प्रमाणपत्र तयार करून शेत बारावरून नाव कमी केल्याचे बिंग फुटताच सासूचा डाव सुनेने हाणून पाडला आहे.प्रकरणी सुनेने न्यायालयात धाव घेत सासूवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की,कोरोनात पतीचा मृत्यू झाला.आपल्या मुलाबाळांना घेऊन माहेरी राहणाऱ्या विधवा सुनेला सासूने चक्क मृत दाखवून जमिनीवरून तिचे नाव कमी केले.त्यामुळे आपल्या हक्काची लढाई लढण्यासाठी गरीब विधवा सुनेला आता न्यायालयात दाद मागण्याची पाळी आली आहे.ती जिवंत असतांना तिला मृत दाखवून शेत जमिनीवरील तिचे नाव कमी केल्याचा धक्कादायक प्रकार गोंदियात घडला.
शहरातील शास्त्री वॉर्डात राहणाऱ्या मीनाक्षी निलेश शेंडे यांचे लग्न २८ जून २०१० रोजी निलेश राजन शेंडे रा.सिंगलटोली,आंबेडकर वॉर्ड यांच्याशी रीतीरिवाजाप्रमाणे झाले.२२ एप्रिल २०२१ रोजी निलेश शेंडे यांचा कोरोनाने मृत्यू झाला.पतीच्या मृत्यूनंतर आसोली येथील भूमापन क्रमांक- ८०९ मध्ये ०.३० हे.आर.जमिनीवर निलेश शेंडे यांचे नाव असल्याने त्या जमिनीवर मीनाक्षी शेंडे,मुलगा अमरीत्य शेंडे व मुलगी अमरीता शेंडे या तिघांची नावे चढविण्यात आली.परंतु,मीनाक्षीची सासू शकुंतला रामचंद शेंडे वय ७० वर्षे,रा.आंबेडकर वॉर्ड सिंगलटोली हिने सून जिवंत असतांनाही तिला मृत दाखवून त्या जमिनीवर आपले नाव चढविले.मीनाक्षी शेंडे हिचा २२ ऑक्टोंबर २०२२ रोजी मृत्यू झाल्याचे सातबारावर नमूद करावे म्हणून शकुंतला शेंडे हिने लेखी अर्ज तलाठी कार्यालय आसोली येथे केला.
नगरसेविका ज्योत्सना संदीप मेश्राम हिने कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडे खोटे शपथपत्र दाखल करून मीनाक्षी शेंडे हिला मृत दाखविले.तहसील कार्यालय येथे पाहणी केली असता मीनाक्षीला मृत घोषित करून त्यांचे नाव जमिनीवरून करण्यात आले आहे.
असे फुटले बिंग👇
आसोली येथील मीनाक्षी शेंडे यांच्या जमिनीतून गॅसची पाईपलाईन जात असल्याने गॅस पाईपलाईन टाकणारे कर्मचारी मीनाक्षीच्या मुलांची सही घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते.त्यांना मीनाक्षी यांनी सातबारावर माझे नाव असून,तुम्ही माझ्या सह्या का घेत नाही? असे विचारले.यावर त्यांनी नमूद जागेवर त्यांचे नाव नसून, सासू शकुंतला रामचंद शेंडे वय ७०, रा.आंबेडकर वॉर्ड,सिंगलटोली,गोंदिया यांचे नाव असल्याचे सांगितले.त्यावरून मीनाक्षी ह्या आसोली येथील तलाठी दीपक नागदेवे यांना भेटल्या व विचारपूस केली असता त्यांना मृत दाखवून शकुंतलाने आपले नाव चढविल्याचे कृत्य समोर आले.
न्यायालयात धाव आणि गुन्हा दाखल👇
घटनेसंदर्भात न्याय मागण्यासाठी विधवा महिलेने न्यायालयात धाव घेतली.मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी न्यायालयीन जावक क्रमांक-१८४-२०२५ अन्वये २१ मार्च २०२५ रोजी फौजदारी अर्ज क्रमांक- १५४-२०२४ वरून फौ.प्र.सं.चे कलम १५६ (३) नुसार भादंवि कलम ४२०,४६८,४७१,४७४,३४ अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
- Advertisement -