- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बलुच लिबरेशन आर्मीने जाफर एक्स्प्रेसचे अपहरण (हायजॅक)केल्याची घटना उघडकीस आली आहे. शोकडोच्यावर प्रवाश्यांना बलुच लिबरेशन आर्मीने नजरबंदीत (ओलीस) ठेवले आहे.अशातच आतापर्यंत २० पाकिस्तानी सैनिक मारल्याचा दावा बलुच लिबरेशन आर्मीने आहे.याशिवाय एक ड्रोनही पाडण्यात आले आहे.त्यामुळे पाकिस्तान सरकारची डोकेदुखी वाढली आहे.पाकिस्तानच्या दक्षिण-पश्चिम बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा येथून खैबर पख्तूनख्वामधील पेशावरकडे जाफर एक्सप्रेस जात असतांना ही घटना घडली.पाकिस्तानी सैन्याने कोणत्याही लष्करी कारवाईचा प्रयत्न केला,तर सर्व ओलीसांना ठार मारू आणि या मृत्यूची जबाबदारी संपूर्णपणे लष्करावर राहील अशीही धमकी दिली आहे.बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने एक निवेदन जारी करून म्हटले की,मशकाफ,धादर आणि बोलानमध्ये ट्रेन हायजॅक करण्यात आले आहे.आमच्या सैनिकांनी आधी रेल्वे ट्रॅक बॉम्बने उडवून दिला,त्यानंतर ट्रेन थांबताच ताब्यात घेतले.ओलिसांमध्ये पाकिस्तानी लष्कर,पोलीस,दहशतवाद विरोधी दल (एटीएफ) आणि इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) चे सक्रिय कर्तव्य कर्मचारी देखील आहेत.जाफर एक्स्प्रेसमध्ये लष्कराचे जवान मोठ्या संख्येने आहेत.ते सुट्टीवर जाण्यासाठी निघाले होते.याची कल्पना असलेल्या बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तान सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे.तुमच्या सैनिकांचे जीव वाचवण्यासाठी अखेरची संधी तुमच्याकडे आहे.सैनिकी कारवाई झाली,तर सगळ्या ओलिसांचे जीव घेऊ,अशी धमकी दिली आहे. पाकिस्तानी लष्करावर दबाव वाढला असून चकमकीत लष्कराचे २० सैनिक मारले गेले आहेत.बलुच लिबरेशन आर्मीने म्हटले की,हे ऑपरेशन मजीद ब्रिगेड, एसटीओएस आणि फतेह पथकाने संयुक्तपणे केले आहे.बीएलएचे प्रवक्ते जिआंद बलोच याने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.दरम्यान, पाकिस्तानी लष्कराने घटनास्थळी हेलिकॉप्टर आणि लढाऊ विमाने पाठवली आहेत.
- Advertisement -