Wednesday, November 18, 2026
Homeगडचिरोलीअखेर वनमजुरांच्या थकीत वेतनाचा प्रश्न मार्गी; उपोषण मागे..

अखेर वनमजुरांच्या थकीत वेतनाचा प्रश्न मार्गी; उपोषण मागे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-थकीत वेतनाच्या मागणीसाठी आलापल्ली येथे गेल्या बारा दिवसांपासून सुरू असलेले वनमजुरांचे उपोषण अखेर आज सोमवारी  मागे घेण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नाची दखल घेतल्यानंतर वनविभागाने प्रलंबित वेतन वनमजुरांच्या बँक खात्यांमध्ये जमा केले. दिवाळीपूर्वी वेतन मिळाल्याने त्यांच्या कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळाला आहे.
आलापल्ली परिसरातील वनमजुरांनी प्रलंबित वेतन तातडीने मिळावे,या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू केले होते.सणासुदीच्या काळातही वेतन न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या.या मागणीसाठी ते गेल्या बारा दिवसांपासून उपोषण करीत होते.
मुख्यमंत्र्यांनी आंदोलनाची दखल घेतल्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार विशेष कार्य अधिकारी अनिरुद्ध पालकर यांनी आज उपोषणस्थळी भेट दिली.त्यांनी वनमजुरांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या व अडचणी जाणून घेतल्या.वेतनाच्या प्रश्नाबाबत शासन त्यांच्या पाठीशी असल्याचा विश्वास पालकर यांनी दिला.तसेच वेतन अदा करण्याच्या कार्यवाहीची माहिती देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली.प्रशासनाच्या पाठपुराव्यानंतर वनविभागाने थकीत वेतनाची रक्कम संबंधित वनमजुरांच्या बँक खात्यांमध्ये वर्ग केली.रक्कम जमा झाल्याची खात्री झाल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.त्यानंतर उपस्थित अधिकाऱ्यांच्या हस्ते पाणी पिऊन त्यांनी उपोषण सोडले.दिवाळीपूर्वी थकीत वेतन मिळाल्याने वनमजुरांनी समाधान व्यक्त केले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बेसुमार महागाई; सर्वजण चिडीचूप..! -पुढाऱ्यांची इच्छाशक्तीही खतम..

उद्रेक न्युज वृत्त :-बेसुमार महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडू लागले आहेत.पण,सर्वजण चिडीचूप राहून एखाद्या नाट्य रसिक जणांप्रमाणे उघड्या डोळ्यांवर झालर पांघरून बसलेत.हल्ली शेतमालाचे भाव पडल्यामुळे...

गडचिरोलीतील वैद्यकीय महाविद्यालय,राष्ट्रीय महामार्ग आणि अन्य विकासकामे अनावश्यक वन्यजीव परवानग्यांच्या अटींमुळे प्रलंबित राहू नयेत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – बांबू लागवडीतून इथेनॉल निर्मितीला चालना..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय,राष्ट्रीय महामार्ग आणि अन्य विकासकामे अनावश्यक वन्यजीव परवानग्यांच्या अटींमुळे प्रलंबित राहू नयेत.प्रत्यक्ष व्याघ्र भ्रमणमार्ग नसलेल्या...

सायबर गुन्हेगारांनी चक्क पोलीस आयुक्तांचाच व्हॉट्सॲप केला हॅक..!

उद्रेक न्युज वृत्त :-सायबर गुन्हेगार कधी काय करतील याचा नेम नाही.सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट करणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी चक्क पोलीस आयुक्तांचेच व्हॉट्सॲप हॅक करून त्यांच्या स्टेटसवर...

आजचे मंत्रिमंडळ निर्णय; नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांकडून लुटून नेलेल्या शस्त्रांबाबत माहिती देणाऱ्यांना मिळणार रोख बक्षीस..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य मंत्रिमंडळाची आज,मंगळवार १७ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत महत्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत एकूण चार निर्णय घेण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!