Wednesday, November 18, 2026
Homeगडचिरोलीअखेर प्रस्तावित स्टील प्रकल्पाच्या भूसंपादन विरोधातील शेतकऱ्यांचे आंदोलन मागे..

अखेर प्रस्तावित स्टील प्रकल्पाच्या भूसंपादन विरोधातील शेतकऱ्यांचे आंदोलन मागे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आष्टी येथे राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेले शेतकऱ्यांचे चक्काजाम व ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार त्यांचे विशेष कार्य अधिकारी अनिरुद्ध पालकर यांनी मध्यरात्री आंदोलनस्थळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या आणि मुख्यमंत्र्यांचे आवाहन त्यांच्यापर्यंत पोहोचवले.या चर्चेनंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.
येणापूर-जयरामपूर परिसरातील प्रस्तावित स्टील प्रकल्पाच्या भूसंपादनाविरोधात १३ गावांतील शेतकऱ्यांनी आष्टी येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-३५३-सी वर आंदोलन सुरू केले होते.प्रकल्पाच्या भूसंपादनातून त्यांची जमीन वगळण्याची त्यांची मागणी होती.या आंदोलनामुळे चंद्रपूर,गडचिरोली आणि दक्षिण गडचिरोलीकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनाची दखल घेऊन विशेष कार्य अधिकारी अनिरुद्ध पालकर यांना आंदोलकांशी प्रत्यक्ष चर्चा करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पालकर यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांच्या मागण्या व म्हणणे ऐकून घेतले.तसेच आंदोलन मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन त्यांच्यापर्यंत पोहोचवले.त्याला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी महामार्गावरील आंदोलन समाप्त केले.
दरम्यान,मुख्यमंत्र्यांशी चर्चा होईपर्यंत संबंधित भूसंपादन प्रक्रिया स्थगित ठेवण्यात आली असून, सध्या त्याबाबत कोणतीही कार्यवाही सुरू नसल्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल तसेच जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.
स्थानिक आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांनीही आदल्या दिवशी आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले होते.आंदोलन मागे घेतल्यानंतर पोलीस प्रशासनामार्फत आंदोलकांना घरापर्यंत पोहोचून देण्याची व्यवस्था करण्यात आली आणि राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बेसुमार महागाई; सर्वजण चिडीचूप..! -पुढाऱ्यांची इच्छाशक्तीही खतम..

उद्रेक न्युज वृत्त :-बेसुमार महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडू लागले आहेत.पण,सर्वजण चिडीचूप राहून एखाद्या नाट्य रसिक जणांप्रमाणे उघड्या डोळ्यांवर झालर पांघरून बसलेत.हल्ली शेतमालाचे भाव पडल्यामुळे...

गडचिरोलीतील वैद्यकीय महाविद्यालय,राष्ट्रीय महामार्ग आणि अन्य विकासकामे अनावश्यक वन्यजीव परवानग्यांच्या अटींमुळे प्रलंबित राहू नयेत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – बांबू लागवडीतून इथेनॉल निर्मितीला चालना..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय,राष्ट्रीय महामार्ग आणि अन्य विकासकामे अनावश्यक वन्यजीव परवानग्यांच्या अटींमुळे प्रलंबित राहू नयेत.प्रत्यक्ष व्याघ्र भ्रमणमार्ग नसलेल्या...

सायबर गुन्हेगारांनी चक्क पोलीस आयुक्तांचाच व्हॉट्सॲप केला हॅक..!

उद्रेक न्युज वृत्त :-सायबर गुन्हेगार कधी काय करतील याचा नेम नाही.सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट करणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी चक्क पोलीस आयुक्तांचेच व्हॉट्सॲप हॅक करून त्यांच्या स्टेटसवर...

आजचे मंत्रिमंडळ निर्णय; नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांकडून लुटून नेलेल्या शस्त्रांबाबत माहिती देणाऱ्यांना मिळणार रोख बक्षीस..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य मंत्रिमंडळाची आज,मंगळवार १७ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत महत्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत एकूण चार निर्णय घेण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!