Wednesday, November 18, 2026
Homeनागपूरअखेर नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात अभिजीत वंजारी यांना विजयाचे प्रमाणपत्र प्रदान.. -...

अखेर नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात अभिजीत वंजारी यांना विजयाचे प्रमाणपत्र प्रदान.. – ३ हजार २७१ मतांनी विजयी; तब्बल ४१ तासांनंतर मतमोजणी प्रक्रिया पूर्ण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत इंडियन नॅशनल काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी विजय मिळविला.त्यांना प्रथम व द्वितीय पसंतीक्रमाची एकूण ६७ हजार २३१ मते मिळाली.तर त्यांचे नजिकचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पार्टीचे सुधाकर कोहळे यांना ६३ हजार ९६० मते मिळाली.म्हणजेच काँग्रेसचे अभिजीत वंजारी हे ३ हजार २७१ मतांनी विजयी झालेत.त्यानुसार,रात्रीच निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी अभिजित वंजारी यांना विजयाचे प्रमाणपत्र प्रदान केले.
नागपूरच्या मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात मंगळवार २७ ऑक्टोंबर रोजी सकाळी आठ वाजता ८४ टेबलवरून मतमोजणीला सुरुवात झाली.४१ पेक्षा जास्त तासांपासून ही मतमोजणी सुरू होती.यावेळी निवडणूक निरीक्षक डॉ.हर्षदीप कांबळे,निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी,विभागातील सर्व जिल्ह्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी,मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पहिल्या पसंतीच्या दोन फेऱ्यांमध्ये कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी आवश्यक ७५ हजार ४३८ मतांचा कोटा पूर्ण करता आला नाही.त्यामुळे निवडणूक प्रक्रियेनुसार द्वितीय पसंतीक्रमाची बाद फेरी घेण्यात आली.पहिल्या पसंतीच्या दोन फेऱ्यांमध्ये १ लाख ६५ हजार ९०६ मतांपैकी १५ हजार ३२ मते अवैध ठरली.तर १ लाख ५० हजार ८७४ मते वैध ठरली.
द्वितीय पसंतीच्या बाद फेऱ्यामध्येही कुठल्याही उमेदवाराला निर्धारित कोटा पूर्ण करता आला नाही. त्यामुळे पहिल्या व द्वितीय पसंतीक्रमाच्या बाद फेरी मिळून सर्वाधिक ६७ हजार २३१ मते घेणाऱ्या अभिजित वंजारी यांना विजयी घोषीत करण्यात आले.
भारत निवडणूक आयोगाने नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम २२ सप्टेंबर रोजी जाहीर केला होता.त्यानुसार २९ सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली.तर २३ ऑक्टोंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान झाले.या निवडणुकीची मतमोजणी २७ ऑक्टोंबर सकाळी ८ वाजता सुरू झाली.तब्बल ४१ तासांनंतर मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली.निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोंबरपर्यंत पूर्ण करण्याचे वेळापत्रक आयोगाने निश्चित केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बेसुमार महागाई; सर्वजण चिडीचूप..! -पुढाऱ्यांची इच्छाशक्तीही खतम..

उद्रेक न्युज वृत्त :-बेसुमार महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडू लागले आहेत.पण,सर्वजण चिडीचूप राहून एखाद्या नाट्य रसिक जणांप्रमाणे उघड्या डोळ्यांवर झालर पांघरून बसलेत.हल्ली शेतमालाचे भाव पडल्यामुळे...

गडचिरोलीतील वैद्यकीय महाविद्यालय,राष्ट्रीय महामार्ग आणि अन्य विकासकामे अनावश्यक वन्यजीव परवानग्यांच्या अटींमुळे प्रलंबित राहू नयेत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – बांबू लागवडीतून इथेनॉल निर्मितीला चालना..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालय,राष्ट्रीय महामार्ग आणि अन्य विकासकामे अनावश्यक वन्यजीव परवानग्यांच्या अटींमुळे प्रलंबित राहू नयेत.प्रत्यक्ष व्याघ्र भ्रमणमार्ग नसलेल्या...

सायबर गुन्हेगारांनी चक्क पोलीस आयुक्तांचाच व्हॉट्सॲप केला हॅक..!

उद्रेक न्युज वृत्त :-सायबर गुन्हेगार कधी काय करतील याचा नेम नाही.सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट करणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी चक्क पोलीस आयुक्तांचेच व्हॉट्सॲप हॅक करून त्यांच्या स्टेटसवर...

आजचे मंत्रिमंडळ निर्णय; नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांकडून लुटून नेलेल्या शस्त्रांबाबत माहिती देणाऱ्यांना मिळणार रोख बक्षीस..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य मंत्रिमंडळाची आज,मंगळवार १७ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत महत्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत एकूण चार निर्णय घेण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!