- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-अंधश्रद्धेच्या नावाखाली नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या एका मांत्रिकास चंद्रपूर गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत त्याच्याविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सतीश भय्याजी गिरसाळवे असे अटक करण्यात आलेल्या मांत्रिकाचे नाव असून मांत्रिकाचा प्रकार वरोरा येथे नुकताच उघडकीस आला होता.अंधश्रद्धेचा आधार घेत वशीकरणासह विविध समस्या दूर करण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक केली जात असल्याची तक्रार स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती.या तक्रारीची दखल घेत पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात पथकाने संबंधित मांत्रिकावर लक्ष ठेवले.त्यानंतर सापळा रचून गिरसाळवे याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. या प्रकरणी मांत्रिकावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष,अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, वशीकरण आणि विविध समस्या दूर करण्याच्या नावाखाली संबंधित मांत्रिकाने किती नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढले,याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू करण्यात आला आहे.
- Advertisement -

